कोई सहरद ना उन्हे रोके॥
याचप्रमाणे मनाला, इच्छाशक्तीला कोण अडविणार ? ते कधीच कोल्हापुरात पोचले होते. मधल्या काळात नोकरी केली असे वाटलेच नाही. त्याच उत्साहात एक वर्ष सरले. अगदी सुरुवातीलाच प्रति पंढरपूर असलेल्या कोल्हापुरातील नंदवाळ येथे आषाढी एकादशीनिमित्त पायी वारी केली. जाता येता हे अंतर बारा किलोमीटर होते.
नंतर पुढे काही दिवसातच पीएच डीच्या विद्यार्थ्यांसाठी आठवडाभर विद्यापीठात व्याख्याने दिली. त्यांच्या विषयांची खूपशी चर्चा केली. 'मुद्रितशोधन' या कोर्समध्ये व्याख्याने झाली. आंतरविद्याशाखीय संशोधनावर PM USHA अंतर्गत शिवाजी विद्यापीठाच्या परिसंवादात व्याख्यान झाले. नाशिकच्या मुक्त विद्यापीठाकडून बी ए साठी एक पुस्तक लिहा, म्हणून फोन पत्र आले. अर्थातच मी पूर्वी लिहिले असल्याने होकार दिला. मग 'मराठी शाहिरी व बखरगद्य' हे पुस्तक लिहून पूर्ण केले. ही प्रक्रिया दररोजची इतर कामे करून दोन महिने चालली. मोठी आनंददायी गोष्ट होती ती. ते लिहिताना पानिपतची गोष्ट आलीच. जानेवारी, १७६१ च्या पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला. सकाळी अकरापर्यंत मराठ्यांची सरशी होत होती. पण मलकाजमानीने अहमदशहा अब्दालीच्या सैन्याला उत्साहित केले. मग झालेल्या घनघोर युद्धात मराठे हरले. कोण ही मलकाजमानी ? असा मोठा प्रश्न पडला. शोध लागायला पंधरा दिवस लागले. मलिका उझ जमानी (युग की राणी) हा किताब आहे. तो शहाजहानने मुमताजला दिला होता, तसेच औरंगजेबाचा नातू महंमदशहाने (रंगीला) आपल्या बादशाह बेगमेस मलिकाजमानी हा किताब दिला होता. महंमदशहा २६ एप्रिल, १७४८ रोजी तर त्याची ही बेगम १४ डिसेंबर, १७८९ मध्ये निधन पावली. औरंगजेबाची मुलगी झेब उन निसा (झेबुन्निसा) आणि बादशाह बेगमेस मृत्यूनंतर दिल्लीत तीस हजारी बाग येथे दफन केले आहे. सध्या दिल्लीत तीस हजारी बाग या नावाचे न्यायालय आहे.
नंतर शिवाजी विद्यापीठाच्या बी ए मराठी अभ्यासक्रमाची मराठी भाषेचे अंतरंग आणि साहित्याची रूपे ही दोन पुस्तके संपादित केली. डॉ. रमेश साळुंखे (देवचंद, अर्जुननगर) यांनीही सहकार्य केले. मराठी भाषेचे अंतरंग चे SIMचे लेखनही केले. एका गौरवग्रंथासाठी 'वारकरी भाषा आणि संस्कृती' हा लेख लिहिला. दैनिक सकाळसाठी 'कोल्हापुरी बोली : तत्त्व आणि व्यवहार' (डॉ. एकनाथ आळवेकर) आणि 'अमृतमंथन' (डॉ. सुनीलकुमार लवटे गौरवग्रंथ) या दोन ग्रंथांवर परीक्षणे लिहिली. मराठी संशोधनाच्या नव्या वाटांवर 'मराठीचे संशोधन : आंतरविद्याशाखीय' हा लेख शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाच्या शिविम पत्रिकेत लिहिला. महाराष्ट्र शासनाच्या एका उपक्रमाच्या पुस्तकात 'मराठी भाषा : रोजगाराच्या संधी' हा लेख लिहिला. त्याच स्वरूपाचे भाषणही महावीर महाविद्यालयात झाले होते. ही नेहमीचीच कामे आहेत, त्यात नवीन असे काहीच वाटले नाही.
दिन डुबे है या डुबे बारात लिये कश्ती, साहिल पे मगर कोई कोहराम नही होता॥ असे म्हणणाऱ्या मीनाकुमारीची शायरी अचानक सापडली, मग काही दिवस या शायरीच्या होशातच गेले. (होश = अच्छी तरह से रहना) Tragedy Queen अभिनेत्री मीनाकुमारीची ही शायरी...
ये रात ये तन्हाई, ये दिल के धड़कनों की आवाज़
ये सन्नाटा, ये डूबते तारों की ख़ामोश गज़ल ख़्वानी
ये वक़्त की पलकों पर सोती हुई वीरानी
जज़्बात-ए-मुहब्बत की ये आख़िरी अंगड़ाई
बजाती हुई हर जानिब ये मौत की शहनाई
सब तुम को बुलाते हैं पल भर को तुम आ जाओ
बंद होती मेरी आंखों में मुहब्बत का
एक ख़्वाब सजा जाओ..!
विनोदकुमार शुक्ल यांना साहित्य अकादमी प्राप्त झाली. त्याचे 'दिवार में एक खिडकी राहती थी' ही कादंबरी वाचली. त्याच वेळी नेटफ्लिक्सवर लिला (leila) ही पाच भागाची मालिका बघितली. त्यामुळे दिल्लीतील पत्रकार प्रयाग अकबरची 'लैला' कादंबरीही वाचली. मालिका त्याच कादंबरीवर आधारित आहे. मग नेटफ्लिक्सवरच्या American Manhunt : Osama Bin Laden आणि चंदन तस्कर The hunt for Veerappan या मालिका भारीच होत्या. Sonyliv वरील Scam 2003 : The Telgi Story (Abdul Karim Telgi) ही स्टॅम्प पेपर घोटाळ्याची मालिका, एक साधा पण हुशार माणूस काय करू शकतो हे दर्शविते. Discovery Science वरील India's Space Oddsy या भागात होमी भाभा, विक्रम साराभाई, सतीश धवन, के. शिवन, अनुराधा, माधवन यांचे संदर्भ घेऊन थुम्बा ते श्रीहरिकोटा हा भारताचा अवकाश प्रवास खूप छान मांडला आहे.
जे जे उत्तम ते ते पाहिले. एक उनाड दिवस, आपला माणूस, अंधाधुंद, दसवी, महाराज, लकी भास्कर, श्रीकांत असे हिंदी-मराठी चित्रपट खूप छान आहेत. स्वामी अँड फ्रेंड्स आणि मालगुडी डेज : द वेंडर ऑफ स्वीट्स या आर के नारायण यांच्या लेखनावरील मालिका आपणास सर्व जुन्या वळणाच्या इंग्रजी काळात घेऊन जातात. Snack attak, Piper या शॉर्ट फिल्म्स तर भारीच होत्या. Tom Hanksचा The Terminal हा चित्रपट Steven Spielbergने दिग्दर्शित केला आहे. या दोघांचे कितीतरी चित्रपट चांगले आहेत. Cast Away त्यातीलच. The Gorge हा एक अतिशय उत्तम विज्ञान चित्रपट (sci-fi movie) होता. Flow व Moana 2 हे चित्रपट ॲनिमेटेड होते. ऑस्कर पुरस्कारप्राप्त The Beatiful Mind हा जाॅन नॅशचा मस्त चित्रपट. जॉन नॅश हा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार प्राप्त प्राध्यापक होता. त्याचे एकाच मुलीशी दोनदा लग्न झाले. २०१५ मध्ये कार अपघातात दोघे पतिपत्नी निधन पावले. त्याची भूमिका रसेल क्रो या अभिनेत्याने केली आहे. हा चित्रपट पाहणे आनंददायी होते. Flow, Moana 2 व आर के नारायण यांचे लेखन सोडल्यास सगळे चित्रपट व मालिका कोणत्या ना कोणत्या वास्तव घटनेवर आधारित होत्या, कादंबऱ्यांवर आधारित होत्या. Damsel हा एक भयानक, विचित्र पण बरा चित्रपट आहे.
कोल्हापुरात हौशी व बिनधास्त लोकांचा भरणा आहे. वकील, डॉक्टर, गृहिणी, बिल्डर यांनी हौसेने सादर केलेली गाणी म्हणजे देवल क्लब येथील रिदम ग्रुप प्रस्तुत 'दिवाना हुआ बादल' हा गाण्याचा कार्यक्रम होय. अर्थात हा कार्यक्रम हौसेखातर एक लाखभर रुपये खर्च करून सर्वांसाठी मोफत होता. देवल क्लबचे नाट्यगृह अतिशय उत्तम आहे. संकर्षणची दोन नाटके एक 'कुटुंबकीरररतन' आणि दुसरे 'नियम व अटी लागू' पाहिले. पहिले केशवराव भोसले नाट्यगृह येथे व दुसरे आनंदभवन (सायबर) येथे. आनंदभवन हे नाट्यगृहसुद्धा भव्यदिव्य आहे. अगदी अलिकडेच प्रशांत दामले यांचे 'शिकायला गेलो एक' हे विनोदी नाटक पाहिले. द मा मिरासदार यांच्या 'व्यंकूची शिकवणी' या कथेवर आधारित हे नाटक भन्नाट आहे. प्रशांत दामलेचा अभिनय बघण्यासारखा आहे. त्यातील 'सुख म्हणजे काय असतं...' हे गाणं उत्तमच. खरेतर सुख म्हणजे नक्की काय असतं? हे प्रशांत दामले यांनी गायलेले प्रसिद्ध मराठी गाणे, जे 'एका लग्नाची पुढची गोष्ट' या नाटकात आहे. प्रशांत दामले आणि कविता मेढेकर यांनी यात एकत्र काम केले आहे. ते गाणं असं...
'मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं ?
काय पुण्य असलं की ते घरबसल्या मिळतं !
दान घेतानाही झोळी हवी रिकामी,
भरता भरता थोडी पुन्हा वाढलेली,
आपण फक्त घेताना लाजायचं नसतं.
देव देतो तेव्हा छप्पर फाडून देतो,
हवंय? नको ! ते म्हणणं प्रश्नच नसतो.
आपण फक्त दोन्ही हात भरून घ्यायचं नुसतं.'
महाराष्ट्र कलोपासक राज्य स्पर्धेतील पुरुषोत्तम करंडकच्या स्पर्धेत सांघिक एकांकिकेत कोल्हापूरच्या कॉमर्स कॉलेजने 'यात्रा' एकांकिका सादर केली तर प्रायोगिक स्पर्धेत लॉ कॉलेजने 'कलम ३७५' एकांकिका सादर केली. दोन्ही एकांकिका त्यांच्या त्यांच्या गटात प्रथम आल्या. त्या एकत्रितपणे देवल क्लब येथेच पाहायला मिळाल्या. अमोल पालेकर सुद्धा शाहू स्मारक येथे दमसाच्या पुरस्कार वितरण प्रसंगी आले होते.
पुस्तके किती वाचली कुणास ठाऊक. सांस्कृतिक, वाङमयीन अशा कितीतरी कार्यक्रमांचा आस्वाद घेतला. प्रदर्शने पाहिली, व्याख्याने ऐकली. शाहू महाराज, जयसिंगराव पवार, सुरेश द्वादशीवार, विवेक सावंत, सदानंद मोरे, टी एस पाटील, दिलीप चव्हाण, ज्ञानेश्वर बंडगर, श्रीरंग गायकवाड, इस्माईल पठाण, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू ज्ञानदेव म्हस्के, बी एम हिर्डेकर, अवनीश पाटील, रवींद्र इंगळे, अमोल पालेकर (मुलाखत) यांची भाषणे ऐकली.
'एक उनाड दिवस' हा अशोक सराफ यांचा चित्रपट पाहिला आणि लगेचच त्यांना पद्मश्री मिळाल्याची बातमी आली. सगळे चित्रपट आणि मालिका अर्थातच ओटीटीवर...! बऱ्याच जमेल त्या कार्यक्रमांनाही हजेरी लावली. दिलिप कुलकर्णी (पत्नी पौर्णिमा) या कोकणातील अवलियाच्या पर्यावरणाची जाण वाचली. मनोजकुमार, जयंत नारळीकर यांनी या जगाचा निरोप घेतला. जयंत नारळीकर यांना २०१५ मध्ये शिवाजी विद्यापीठात भेटलो होतो.
आणखी खूप काही आहे, आता बस इतकेच...!
🪴
No comments:
Post a Comment