बी ए ३ मराठी भाषा व भाषाविज्ञान : अर्थपरिवर्तन : कारणे व प्रकार
Click here 👇
Dr. Anil Gavali is well known researcher of Linguistics, Criticism, Sant Poem and Modern Literature in Marathi Language. Serve as Dean of Arts and Fine Arts Faculty and Chairperson Board of Studies in Marathi at Shivaji University, Kolhapur (Maharashtra : India) Worked as a member of Senate and Academic Council at Shivaji University.
व्यंजन : मराठीत एकूण ४१ व्यंजने आहेत. ज्याचा उच्चार करतांना जिभेचा कंठ, टाळू, मुर्धा, दात, ओठ, या अवयवांशी स्पर्श होतो त्यांना व्यंजन असे म्हणतात. या ४१ व्यंजनांपैकी ३४ व्यंजनाचे पाच प्रकारात विभाजन केले जाते. स्पर्श व्यंजनण (ही २५ आहेत). < br/> अर्धस्वर व्यंजन (ही चार आहेत.)< br/> उष्मा, घर्षक व्यंजने (ही तीन आहेत.)< br/> महाप्राण व्यंजन (हे एक आहे.< br/> स्वतंत्र व्यंजन (हे एक आहे.)
1. स्पर्श व्यंजने (एकीण २५) :
वर्णमालिकेतील क ते य पर्यंतच्या वर्णाचा उच्चार होत असतांना तोंडातील जीभ, कंठ, टालू, मुर्धा, दात व ओठ इत्यादी अवयवांशी स्पर्श होतो यामुळे या वर्णांना स्पर्श व्यंजने असे म्हणतात.
उदा . क, ख, ग, घ, ङ, च, छ, ज, झ, ञ, ट, ठ, ड, द, ण, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म
स्पर्श व्यंजनाचे तीन प्रकारात वर्गीकरण केले जाते.
कठोर वर्ण
मृदु वर्ण
अनुनासिक वर्ण
१. कठोर वर्ण – ज्या वर्णाचा उच्चार करण्यास जोर द्यावा लागतो त्यांना कठोर वर्ण असे म्हणतात. उदा. क, ख, च, छ, ट, ठ, त, थ, प, फ
२. मृदु वर्ण – ज्या वर्णाचा उच्चार सौम्यपणे होतो त्यांना मृद वर्ण असे म्हणतात. उदा. ग, घ, ज, झ, ड, ढ, द, ध, ब ,भ
३. अनुनासिक वर्ण – ज्या वर्णाचा उच्चार त्याच्या उच्चार स्थानासोबत काही अंशी नाकातूनही केल्या जातो त्यास अनुनासिक असे म्हणतात. उदा. ङ, ञ, ण, न, म
ज्याच्या पूर्ण उच्चारासाठी स्वराची मदत घ्यावी लागते अशा भाषिक वर्णाला व्यंजन म्हणतात. व्यंजनांचा उच्चार करण्यासाठी तोंडातील काही अवयवांमार्फत हवा अडवली जाते. उदा० जिभेचा टाळूवर स्पर्श होऊन मूर्धन्य व्यंजनांचा उच्चार होतो.
मराठी व्यंजनांचे पाच प्रकारात विभाजन केले आहे. हे प्रकार पुढीलप्रमाणे-
कण्ठ्य, तालव्य आदि संज्ञा प्राचीन भारतीय उच्चारशास्त्रज्ञांच्या शास्त्रीय परिभाषेतील संज्ञा आहेत.
मराठी लिपीत क्ष (क्ष) आणि ज्ञ ही दोन जोडाक्षरे त्यांच्या नित्य वापरामुळे मूलध्वनी समजली जातात. हिंदीत क्ष, ज्ञ, श्र. आणि त्र ही जोडाक्षरे मूलध्वनी समजली जातात. मराठी भाषेतील ज्ञ हा दंत्य आहे, बंगालीतला ज्ञ (ज्ञ) तालव्य आहे, तर हिंदीतला ज्ञ (ग्य) कंठ्य आहे. मराठीतले च़, छ़, ज़, झ़ हे दंततालव्य आहेत, आणि फ़ दंतोष्ठ्य आहे..
असा प्रश्न पडलेल्यांना आता या भागात त्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. जिज्ञासूने वर सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या भागांचा संयोग करून वेगवेगळे वर्ण उच्चारून पहावेत, म्हणजे त्यांतील फरक आणखी स्पष्टपणे त्याच्या लक्षात येईल.
श-सदर वर्णाचा उच्चार करतांना वरच्या दाताच्या मागील बाजूस स्पर्श करावा. म्हणजे कठोर तालुला स्पर्श करूनच 'श' वर्णाचा अचूक उच्चार करता येतो.
ष-हे मूर्धन्य वर्ण आहे. 'ष'चा उच्चार करतांना जिभेचा शेंडा तालू व कंठ यास जाऊन भिडतो.म्हणजे 'ष'उच्चारतांना जिभेचा शेंडा मूर्धास घर्षण करून जातो.अशावेळेस 'ष'अचूक उच्चार बाहेर पडतो.
तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनीला वर्ण असे म्हणतात. बोलतांना आपले मूलध्वनी हवेत विरू नयेत म्हणून आपण लिहून ठेवतो. ज्या सांकेतिक खुणांनी आपण मूलध्वनी लिहून ठेवतो त्या सांकेतिक खुणेला ध्वनिचिन्हे किंवा अक्षर असे म्हणतात. अक्षर म्हणजे नष्ट न होणारे. मराठी भाषेत एकूण ५९ वर्ण आहेत. या वर्णाच्या मालिकेलाच वर्णमाला किंवा मुळाक्षरे असे म्हणतात.
अ, आ, ॲ, ऑ, इ, ई, उ, ऊ, ऋ, ॠ, ऌ, लॄ, ए, ऐ, ओ, औ, अं, अ:
क, ख, ग, घ, ङ, च, छ, ज, झ, ञ, च़, छ़, ज़, झ़, फ़, ट, ठ, ड, ढ, ण, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, ष, स, ह, ळ, क्ष, ज्ञ
मराठीत एकूण ५९ वर्ण आहेत.
स्वर
स्वरादी
व्यंजन
१. स्वर : ज्या वर्णाचा उच्चार कंठातील कोणत्याही अवयवाचे सहाय्य न घेता होतो, त्या वर्णांना स्वर असे म्हणतात. वर्णामुळे स्वर हे पूर्ण उच्चाराची मानली जातात. मराठी भाषेत अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, ॠ, ऌ, लॄ, ए, ऐ, ओ, औ असे एकूण बारा स्वर आहेत. वरील स्वरांचे एकूण तीन प्रकार पडतात.
ऱ्हस्व स्वर
दीर्घ स्वर
संयुक्त स्वर
१. ऱ्हस्व स्वर : ज्या स्वरांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो त्या स्वरांना ऱ्हस्व स्वर असे म्हणतात. उदा. अ, ॲ, इ, ऋ, ऌ, उ
२ दीर्घ स्वर : ज्या स्वरांचा उच्चार करण्यास जास्त वेळ लागतो त्यांना दीर्घ स्वर असे म्हणतात. उदा. आ, ऑ, ई, ऊ, ए, ऐ, ओ, औ
स्वरांचे इतर प्रकार :
१ सजातीय स्वर : एकाच उच्चार स्थांनामधून जाणार्या:स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात. उदा. अ-आ, ॲ-ऑ, उ-ऊ, ऋ-ॠ, ऌ-लॄ, ए-ऐ, ओ-औ,
२. विजातीय स्वर : भिन्न उच्चार स्थांनामधून उच्चारल्या जाणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात. उदा. अ-ई, उ-ए, ओ-ऋ
३ संयुक्त स्वर : दोन स्वर मिळून तयार होणाऱ्या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात. असे ४ स्वर आहेत.
ए – अ+इ/ई ऐ – आ+इ/ई ओ – अ+उ/ऊ औ – आ+उ/ऊ
२ स्वरादी : ज्याचा उच्चार करण्याआधी स्वर येतो त्यांना स्वरादी असे म्हणतात. स्वर + आदी – स्वरादी दोन स्वरादी – अं, अः . स्वरादीमध्ये अनुस्वार व विसर्ग यांचा समावेश होतो.
स्वरादीचे एकूण तीन प्रकार आहेत.
अनुस्वार,
अनुनासिक,
विसर्ग
क. अनुस्वार – स्वरावर किंवा अक्षरावर मागाहून स्वार होणारा वर्ण किंवा स्वरानंतर होणारा उच्चार म्हणजे अनुस्वार होय. जेव्हा हा उच्चार स्पष्ट व खणखणीत होतो तेव्हा त्याला अनुस्वार असे म्हणतात. उदा. गंगा, चंचल इत्यादी.
ख. अनुनासिक – जेव्हा अनुस्वाराचा उच्चार ओझरता होत असेल तेव्हा त्या उच्चाराला अनुनासिक असे म्हणतात. उदा. घरांत, जेव्हां, फुफ्फुसांतील, आम्हांला, टपालहंशील, हंहंहं, हांहांहां, हूं का चूं, हुंकार, इत्यादी.
ग. विसर्ग – विसर्ग याचा अर्थ श्वास सोडणे असा होतो. विसर्गाचा उच्चार होत असतांना स्वराच्या उच्चारानंतर ह-हा-हि-ही-हु-हू सारखा उच्चार होतांना हवेचे किंचित विसर्जन होते म्हणून यास विसर्ग असे म्हणतात. याचे चिन्ह लिहून दाखविताना अक्षराच्या पुढे दोन टिंबे देतात. मराठीत विसर्गयुक्त शब्द जवळजवळ नाहीत. (दुःख, क:पदार्थ ह्यांतली विसर्गसदृश चिन्हे विसर्ग नाहीत!) आहेत त्यांपैकी हे दोन :- उदा. स्वत:, मन:शाती, नि:स्पृह, निःश्वास, निःशंक, इत्यादी.
३.व्यंजन : एकूण व्यंजन ४१ आहेत. ज्याचा उच्चार करतांना जिभेचा कंठ, टाळू, मूर्धा, दात, ओठ, या अवयवांशी स्पर्श होतो त्यांना व्यंजन असे म्हणतात.
व्यंजने पाच प्रकारची आहेत.
स्पर्श व्यंजन (३२)
अर्धस्वर व्यंजन (४)
उष्म, घर्षक व्यंजन (३)
महाप्राण व्यंजन (१)
स्वतंत्र व्यंजन (१)
जिव्हामूलीय उदा. दु:ख:, कःपदार्थ: यांमधील विसर्गासारखे चिन्ह.